निवडणुकीमध्ये 18 ते 20 तास काम करण्याची तयारी ठेवावी – चंद्रकांत पाटील
पुणे: आगामी निवडणूक पूर्वी आपल्या हातात 18 महिने असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयारी करत कमी वेळेत अधिक कामे जनतेची करावी. सरकार कोणाचे ही असेल तरी प्रशासन कायम असते आणि ते प्रत्येकाचे कामकाज पाहते त्यांच्या पाठीमागे लागून कामे करून घ्यावी लागतात. निवडणुकीमध्ये 18 ते 20 तास काम करण्याची तयारी सर्वांनी ठेवावी आणि त्यानुसार कामाचे नियोजन करावे. कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेताना त्याबाबत नियोजन करावे असा सल्ला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री झाल्यामुळे भाजप पुणे शहर तर्फे आज त्यांचे सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजपचे आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, ॲड एस. के. जैन, माजी आमदार बाळा भेगडे, योगेश टिळेकर, बापू पठारे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, मकरंद देशपांडे, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बिडकर, वर्षा तापकीर, गणेश घोष, दीपक नागपुरे, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, बापू मानकर उपस्थित होते.
कोल्हापूरमधील चार पैकी कोणत्याही मतदारसंघातून मी निवडून येऊ शकतो असे सांगून पाटील म्हणाले, अमित शहांनी सांगितले म्हणून मी कोथरूडला आलो. मला मेवा म्हणून ही उमेदवारी दिलेली नाही. हे पक्षाने दिलेले मोठे मिशन होते. पण सरकार गेल्याने ते अर्धवट राहिले आहे. २०१४, २०१९ ला राज्यात सरकार येण्यासाठी ज्या जागा कमी पडल्या त्या भरून काढण्याची ताकद पुणे आणि जिल्ह्यात आहे. त्यासाठीच मी पुण्यात आलो. त्यासाठी नीट कामाला लागा.भांडाभाडी करू नका. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
बाळा भेगडे म्हणाले, चंद्रकांत पाटील राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सातत्याने कार्यकर्त्यांना पाठबळ दिले. राज्य सरकार विरोधात प्रत्येक संघर्षात दादांनी जे काम केले ते अतुलनीय आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी काम केले आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पश्चिम महाराष्ट्र मधील विभागीय सुसज्ज कार्यालय पुण्यात निर्माण करण्यात यावे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले,सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असे व्यासपीठ चंद्रकांत दादा उपलब्ध करून देतील. चंद्रकांत पाटील लोकप्रमुख पालकमंत्री असतील. येणाऱ्या पुढील काळात सर्व रखडलेले महत्वाचे प्रकल्प मार्गीलागतील.दहशतीचे राजकारण थांबेल. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल.विकासाचे आणि जनतेच्या कल्याणाचे राजकारण असेल.
जगदीश मुळीक म्हणाले, चंद्रकांत दादा यांनी. सामान्य कुटुंबातून येऊन राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला आहे.राजकीय पार्श्वभूमी नसताना झोकून देऊन काम केले.पक्षासाठी समर्पित काम केले.जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम करतात.अव्याहत काम करतात.कुशल संघटक आहेत.
राष्ट्रवादीची शहरात गुंडगिरी ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, आता राष्ट्रवादीची दादागिरी चालणार नाही.पुढच्या काळात भाजप विकासाचे काम करेल. त्या आड येणाऱ्या गुंडांना सोडणार नाही. पुणे सर्वार्थाने स्मार्ट काम करू. भ्रष्टाचारी आणि दादागिरी असणाऱ्या सत्तेपासून दूर ठेवू. असे जगदीश मुळीक म्हणाले.
