fbpx

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी आलेल्या १०० पेक्षा जास्त गाड्यांना पोस्टर लावून छात्रभारतीने केला शाळाबंदीच्या निर्णयाचा निषेध

पुणे:BKC च्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई बाहेरुन आलेल्या सर्व एसटी व खाजगी बसेसला छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोस्टर लावत ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

“एसटीला भरले १० कोटी शाळाबंदीचा निर्णय रोखेल शिक्षणाची गती”

“शिंदे साहेबांना सांगाल का ? शाळाबंदी करु नका “

“जिल्हा परिषदेची मुलं लय लावतील लळा, शिंदे साहेबांना सांगा नका लावू शाळांना टाळा”

“बसला भरले १० कोटी , शिक्षण नेले मागे आश्वासन खोटी”

अशा आशयाचे स्टीकर लावून छात्रभारती विद्यार्थी संघटनेने राज्याध्यक्ष रोहित ढाले यांच्या नेतृत्वाखाली शाळाबंदीच्या निर्णयाचा धिक्कार केला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: