Sunday, June 21, 2026
Latest NewsSports

पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत द व्हर्लविंड्स संघाचा सलग तिसरा विजय

परमार ऑल स्टार्स संघाचा विजय
पुणे : पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत साखळी फेरीत द व्हर्लविंड्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय मिळवला.
पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नीरज अरोरा, रोहित चोप्रा, विघ्नेश सांघवी, साहिल हांडा यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर द व्हर्लविंड्स संघाने मनिषा रॉयल्ससंघावर 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात परमार ऑल स्टार्स संघाने सांघवी शुटर्स संघाचा 4-1 असा पराभव करून आगेकूच केली. सिद्धार्थ मोदी, दशमेश कालरा, संजय दिडी, सनत परमार, कैवल्य खानपुरे यांनी विजयी कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:साखळी फेरी:
परमार ऑल स्टार्स वि.वि.सांघवी शूटर्स 4-1(15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: नवीन कोचर पराभुत वि.गिरीश दामले 32-92; दुहेरी: सिद्धार्थ मोदी/दशमेश कालरा वि.वि.संजय सांघवी/रणजीत पांडे 100-81; हँडीकॅप बिलियर्ड्स: संजय दिडी वि.वि.राजु खांडके 200-117; 6रेड हँडीकॅप स्नूकर: सनत परमार वि.वि.धीरज कोचर 78-42, 67-52; ब्लु शूटआऊट: कैवल्य खानपुरे वि.वि.शाम राठी 2-0);
द व्हर्लविंड्स वि.वि.मनिषा रॉयल्स 3-2(15रेड हँडीकॅप स्नूकर एकेरी: विघ्नेश सांघवी वि.वि.सिद्धार्थ थडानी 116-66; दुहेरी: नीरज अरोरा/रोहित चोप्रा वि.वि.पंकज परमार/कुणाल वासवानी 91-56; हँडीकॅप बिलियर्ड्स: साहिल हांडा वि.वि.माधव क्षीरसागर 200-185; 6रेड हँडीकॅप स्नूकर: निशांत मेहता पराभुत वि.कायोमुर्झ चींडी 45-54,29-73; ब्लु शूट आऊट: कपिल सामंत पराभुत वि. राजन खिंवसरा  0-1)

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading