Thursday, May 7, 2026
Latest NewsPUNE

गणेश चतुर्थी आणि विसर्जनाच्या दिवशी शहरातील दारू दुकाने बंद राहणार – अमिताभ गुप्ता

पुणे : राज्यभरात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून देखील जय्यत तयारी केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन सांगितले आहे. गणेश चतुर्थी आणि विसर्जनाच्या दिवशी शहरातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

१० तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.यासोबतच ज्या ठिकाणी सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणच्या मार्गावरील सर्व भागातील मद्यविक्री विसर्जनाच्या दिवशी बंद करण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या 10 दिवसात अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार असल्याने नागरीकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात असेल. त्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासूनच शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यात नागरीकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे रोखण्याला मदत होणार आहे. अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
अमिताभ गुप्ता म्हणाले, 3600 सार्वजनिक मंडळ पुण्यात आहेत. गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होतात. प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने गर्दीचे नियोजन तसेच ट्रॅफिकचे नियोजन देखील केलेले आहे. 7500 हजार पोलिस रस्त्यावर गणेशोत्सवात सज्ज आहेत. मंडळाकडून वाहतूक अडथळा होत असेल तर त्यांना देखील सूचना दिल्या आहेत.असं देखील अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणत्याही मंडळाने जर डिजेच्या आवाजाचे उल्लंघन झालं तर कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे मंडळापुढे मिरवणुकी दरम्यान किती ढोल पथक लावण्यासाठी कोणतंही बंधन नसणार आहे. देखाव्यासाठी भाविकांना दर्शनासाठी कुठली ही अडचण येणार नाही अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. बाहेरून चोरी कारणासाठी येणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना सोयीसाठी पुणे पोलिस ट्विटर हॅण्डल वर सगळ्या अपडेट मिळतील, असं गुप्ता यांनी सांगितलं आहे.
विसर्जनाच्या मिरवणुकीचे येथे मेट्रोचे काम चालले आहे त्यावर गुप्ता बोलले,विसर्जनाचे घाट जिथे मंडळ येत असतात तिथे आता मेट्रो चे खांब आहेत. त्यामुळे यंदा गणेश मंडळांच्या देखाव्याची उंची 20 फूट असावी.त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीला 18 फूट देखावे असावे. कोथरूडकडून येणारे मंडळ जे आहेत त्यांनी उंची 16 फूट असावी.
गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी काही रोड बंद केले जातील. या बाबतीत सविस्तर नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. पी एम पी एल बसेस साठी देखील पर्यायी मार्ग दिलेले आहेत. अथर्व पठण साठी येणाऱ्या महिलांना वाहतुकीची अडचण होणार नाही याची दखल घेण्यात येणार असल्याचं अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading