ईटी मनीच्या ‘इंडिया इन्व्हेस्टर पर्सनॅलिटी रिपोर्ट 2022’मध्ये उलगडली गुंतवणुकदारांची मानसिकता, वर्तन आणि पॅटर्न्सविषयी खास माहिती
नवी दिल्ली : ईटी मनी, या भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड्स अप आणि वेगाने विकसित होत असलेल्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मने नुकताच ‘इंडिया इन्व्हेस्टमेंट पर्सनॅलिटी रिपोर्ट 2022’ हा खास अहवाल सादर केला असून त्यात लाखो गुंतवणुकदारांची मानसिकता उलगडण्यात आली आहे. जोखीम घेण्याची क्षमता, नुकसान टाळता येणे, आर्थिक कौशल्य आणि अतीआत्मविश्वासाची पातळी या चार प्रमुख निकषांच्या मदतीने गुंतवणुकदारांच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण करत कंपनीने गुंतवणुकदारांची अनोखी शैली या अहवालात उलगडली आहे.
या विश्लेषणात गुंतवणुकदारांच्या व्यक्तिमत्त्वानुसार ८ अनोखे प्रकार नमूद करण्यात आले असून ते त्यांच्या मानसिकतेशी मिळतेजुळते आहेत. या अहवालानुसार बहुतांश भारतीय गुंतवणूकदार धोरणी (३५ टक्के) – म्हणजेच आखीव (कॅलक्युलेटेड) जोखीम लक्षात घेऊन कृती करणारे आहेत, तर एक्सप्लोरर्स (३१ टक्के) – गुंतवणूकदार स्मार्ट आणि काही वेळेस अतीआत्मविश्वासाच्या जोरावर जोखीम घेणारे आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे.
गुंतवणुकदारांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर प्रकारांमध्ये – अनालायझर, सीकर, अडव्हेंचरर, रिसर्चर आणि ऑब्झर्व्हर या प्रकारांचा समावेश असून देशातील ३४ टक्के गुंतवणूकदार अशा प्रकारचे आहेत.
या अहवालानुसार भारतीयांची जोखीम घेण्याची क्षमता ५२ ते ८१ च्या श्रेणीत असून याचा अर्थ गुंतवणुकीच्या बाबतीत माफक जोखीम घेण्याची त्यांची तयारी असते. उच्च जोखीम घेण्याच्या क्षमतेमुळे दीर्घकाळात लाभ होत असला, तरी या अहवालानुसार कमी जोखीम घेण्याची पातळी असलेलेही इक्विटीमध्ये मोठी गुंतवणूक करत असून ते जोखीम घेण्याच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शक आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे, की बहुतांश भारतीय वारंवार होणारा तोटा सहन करूशकत नाहीत आणि तरीही ते उच्च जोखीम घेतात, ज्यामुळे बाजारपेठ अस्थिर होताना तेही अस्वस्थ होतात.
विशेष म्हणजे, या अहवालानुसार चांगली आर्थिक साक्षरता असलेले भारतीय गुंतवणूकदार त्यांच्या एसआयपीच्या बरोबरीने मोठ्या रकमेची धोरणात्मक गुंतवणूक करत आहेत, तर कमी आर्थिक कौशल्य असलेले केवळ एसआयपीवरच अवलंबून राहात आहेत. सकारात्मक बाजू म्हणजे, स्त्री गुंतवणूकदार अधिक संघटित आहेत आणि चांगले नियोजन करत आहेत. त्यामुळे पुरुषांशी तुलना करता धोरणी आणि संशोधक व्यक्तिमत्त्वाच्या गुंतवणूकदारांमध्ये त्यांचा जास्त प्रमाणात समावेश होतो.
या खास अहवालाच्या सादरीकरणाविषयी ईटी मनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश कालरा म्हणाले, ‘गुंतवणुकीविषयीच्या तुमच्या पूर्वग्रहांवर तुमच्या पैशांची वाढ अवलंबून असते. या पूर्वग्रहांच्या मदतीने गुंतवणुकीचे स्मार्ट निर्णय घेता येतात. ‘ईटी मनी इंडिया इन्व्हेस्टमेंट पर्सनॅलिटी रिपोर्ट 2022’मुळे प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेता येते, उदा. भारतीय गुंतवणूकदार कशाप्रकारे त्यांची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात न घेता अंधपणे परताव्यांच्यामागे लागलेले असतात हे यात सांगण्यात आले आहे. विचारांचा गुंता सोडवण्यातून अधिक चांगले निर्णय घेता येतात आणि गुंतवणुकीच्या निर्णयामागे नेमकी कशाची चालना आहे हे समजून घेता येते. याच कारणामुळे ईटी मनी जीनियस हे आमचे प्रमुख उत्पादन आधी युजरच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकार जाणून घेते आणि त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओची शिफारस केली जाते. या अहवालानुसार भारतीयांचे गुंतवणूक निर्णय बाजारपेठेतील तेजी व उच्च परतावे यांच्यावर अवलंबून असतात आणि हे वर्तन बदलण्याची गरज आहे. ईटी मनी जीनियस ही सदस्य सेवा असून याबाबतीत गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट समजून घेण्यासाठी आणि उच्च लाभ देणारे पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी मदत करणारी आहे.’
