Friday, May 15, 2026
BusinessLatest News

महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स आणि मॅड अबाउट व्हील्स यांच्यातर्फे एकत्रितपणे एमएडब्ल्यूच्या ग्राहकांना मोटर विमा पुरवणार

मुंबई : महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेड (एमआयबीएल) या महिंद्रा आणि महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या (महिंद्रा फायनान्स) उपकंपनीने मॅड अबाउट व्हील्स (एमएडब्ल्यू) – या भारतातील पहिल्या ब्रँड अग्नोस्टिक इलेक्ट्रिक मोबिलिटी आमि ऑटोमोटिव्ह सुविधा पुरवठादार कंपनीशी भागिदारी जाहीर केली आहे. या धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून एमएडब्ल्यू वितरकांना इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सर्वसमावेशक मोटर विमा उत्पादने पुरवणे शक्य होणार आहे.

या भागिदारीमुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री करणाऱ्या एमएडब्ल्यू वितरकांना एमआयबीएलच्या विमा भागिदारांची विविध विमा उत्पादने उपलब्ध होतील. ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक व वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसे विमा कवच तुलना करून निवडता येईल.

एमआयबीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख अधिकारी वेदनारायण शेषाद्री म्हणाले, ‘या अनोख्या वितरण भागिदारीमुळे एमएडब्ल्यूचे वितरक- भागादीर एमआयबीएलचा प्लॅटफॉर्म वापरून उद्योन्मुख ईव्ही क्षेत्राला विमा उत्पादने पुरवू शकतील. भारतातील दुचाकी व तीन चाकी ताफ्यांत होत असलेली लक्षणीय वाढ लक्षाच घेता या भागिदारीमुळे एमएडब्ल्यू वितरक भागिदारांना विस्तृत व्याप्तीसह विमा पुरवणे शक्य होईल.’

मॅड अबाउट व्हील्सचे सह- संस्थापक अमरेश खेरम्हणाले, ‘एमआयबीएलबरोबर केलेल्या भागिदारीमुळे आम्हाला या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात विस्तार करण्यास आणि नव्या युगातील वितरक तसेच ओईएम ब्रँड्सचा प्लॅटफॉर्मवर समावेश करण्यास मदत होईल. पर्यायाने ईव्ही व्यवसाय विस्तारणे शक्य होईल. मला खात्री आहे, की अशा प्रकारच्या अनोख्या भागिदारीचा पूर्ण ईव्ही क्षेत्राला लाभ होईल. विस्तारित वॉरंटीचे आमचे प्रमुख उत्पादन यशस्वीपणे कार्यरत आहे व तिथे आम्ही २०,००० हजार ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे.’

उदयोन्मुख आणि विकसनशील उद्योग व विमा तसेच अशा उत्पादनांची त्यांची गरज लक्षात घेत ही भागिदारी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading