११६ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार
पुणे : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था व ह्यूम्यानिटेरियन वेल्फेअर अंड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने जयपालसिंग मुंडा रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षणद्वारे महाराष्ट्रातील ११६ आदिवासी मुलांना एक्स – रे टेक्निशियन , इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन , फ्लेबोटोमिस्ट् व जनरल ड्युटी असिस्टंट आदींचे प्रशिक्षण दिले गेले होते. सेंट जॉर्जेस हॉस्पिटल मधील एक्स – रे टेक्निशियन हा कोर्स पूर्ण केलेल्या २६ विद्यार्थ्यांना डॉ. राजेंद्र भारुड (आयुक्त, टी. आर. टी. आय), श्री.हंसद्धवज सोनवणे ( सहसंचालक टी. आर. टी. आय ), श्रीमती रेखा कुडमुलवार ( संशोधन अधिकारी टी. आर. टी. आय), श्रीमती.क्रिस्टीन स्वामीनाथन ( ह्युम्यानिटेरियन वेल्फेअर अंड रिसर्च फाउंडेशन अध्यक्ष ) यांच्या हस्ते नुकतेच प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे देण्यात आले.
या प्रसंगी बोलताना सोनवणे म्हणाले की कोविड महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्रात सुविधांची कमतरता जाणवली त्याच अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने काही हेल्थकेअर सेक्टर मध्ये विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांकरिता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण लागू केले आहे. त्या प्रशिक्षणासाठी ह्युम्यानिटेरियन वेल्फेअर अंड रिसर्च फाउंडेशन संस्था आणि आम्ही मिळून हेल्थ केअर सेंक्टर मध्ये जनजागृती करून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देऊन नोकरीचे संधी उपलब्ध करून दिली.
रेखा कुडमुलवार म्हणाल्या की मुंबई येथील सेंट जॉर्जेस हॉस्पिटल व अमरावती परतवाडा येथील विदर्भ नर्सिंग आणि वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याठिकाणी आतापर्यंत ११६ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन फमिली केअर हॉस्पिटल, लायन ताराचंद बापा हॉस्पिटल,एस आर मेहता व सर किकाबाई प्रेमचंद कार्डीक इनस्टीट्युट, योगवेदा क्लिनिक, हेलिंग हार्टस, आयुष हॉस्पिटल सदरील हॉस्पिटलमध्ये रोजगार दिला.
क्रिस्टीन स्वामिनाथन म्हणाल्या की ह्यूम्यानिटेरियन वेल्फेअर अंड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून आम्ही कार्यरत आहे. अशाच प्रकारे वर्षभरात ९६० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे. विध्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी केअर वाले, ओ.टी.यु, पोरटिया या संस्थे आम्हाला मोलाची साथ दिली. भविष्यकाळात आदिवासी युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगारास पात्र बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा जाधव यांनी केले तर आभार क्रिस्टीन स्वामिनाथन यांनी मानले.
