Saturday, May 9, 2026
Latest NewsPUNE

ऐतिहासिक नाना वाड्यातील पुणे महापालिकेची कार्यालयं हटवा – मनसे नेते वसंत मोरे

नाना वाड्याच्या दुरावस्थेवर मोरे यांची फेसबुक लाईव्हद्वारे नाराजी   

पुणे : पेशवेकालीन वास्तुशास्त्रीची ओळख असलेल्या ऐतिहासिक वास्तूं पैकी एक म्हणजे वसंत टॉकीज शेजारील नाना वाडा. या वाड्याची दुरावस्था झाली असून पालिकेच्या वतीने त्यांचे जतानाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या वास्तूवर पालिकेच्या कार्यालयांचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे नाना वाड्यातील पुणे महापालिकेची कार्यालयं हटवा, अशी मागणी मनसे नेते वसंत मोरे यांनी केली आहे. या संदर्भात मनसे तर्फे एक निवेदन पुणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

मोरे म्हणाले, पुणे मनपाच्या मालकीचा 1780 साली पेशव्यांचे प्रमुख कारभारी नाना फडणीस यांनी त्यांना राहण्यासाठी बांधलेला हा नाना वाडा प्रसिद्ध लाल महालसमोर आहे. या ठिकाणी पुणे मनपाचा रेकॉर्ड विभाग आहे. लाखो कागदपत्रे इकडे आहेत, त्यामुळे ही वास्तू अजून धोकादायक झाली आहे. एक शाळा, एक अभ्यासिका, एक नृत्य क्लास असे अनावश्यक विषय इथे आहेत. लवकरच या सर्वांना बाहेर काढून ही वास्तू पुन्हा आहे तशी करावी. अशी आमची मागणी आहे.

पुढे बोलताना मोरे म्हणाले, अतिशय आखीवरेखीव, सुंदर असे काम या वाड्याचे झालेले पाहायला मिळते. 20 गुंठ्यांमध्ये ही वास्तू आहे. येथील लाकडी काम सुरू आणि सागवान या माध्यमातून झालेले आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा येथे चालवली जाते. 1953 साली पुणे महापालिकेने ही वास्तू विकत घेतली. महापालिकेकडे नाना वाडा, विश्रामबाग वाडा, लाल महाल आणि महात्मा फुले मंडई अशा चार वास्तू महापालिकेकडे आहेत. महापालिका करोडो रुपये या वास्तूच्या देखभालीसाठी खर्च करते. मात्र आज या वाड्याची दुरवस्था झाली आहे, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे.

येथे धुळीचे साम्राज्य असून अनेक ठिकाणी जाळ्या झाल्या आहेत. काम सुरू असल्यामुळे हा वाडा नागरिकांसाठी बंद आहे. वाड्याच्या जतनाचे काम 2010पासून सुरू झाले. आजघडीला महापालिकेचे एक रेकॉर्ड रूम आहे. त्याची कागदपत्रे पाहायला मिळतात. महापालिकेच्या ताब्यात आहे, याचा अर्थ अशाप्रकारची कार्यालये येथे उभारणे गरजेचे नाही. यासह इतर वास्तूंमधील कार्यालये तातडीने हटवा, अशी मागणी वसंत मोरेंनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading