शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती; आगामी निवडणुका एकत्र लढणार
मुंबई : शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरआता शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. तसेच आगामी काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र निवडणुका लढणार असल्याचे ही स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एक वेगळे राजकीय समिकरण पाहायला मिळणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेवून या युतीची घोषणा करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, प्रादेशिक अस्मिता आणि संविधान टिकवण्यासाठी ही युती करत आहोत. संभाजी ब्रिगेड या पुरोगामी संघटनेच्या रूपात शिवसेनेला एक लढवैया सहकारी मिळणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, यापूर्वी आम्ही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक लढे दिले आहेत. तर व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आम्ही राजकीय पक्ष ही सुरू केला. सध्य स्थितीत लोकशाही आणि संविधान धोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. त्याविरोधात लढण्यासाठी समविचारी पक्ष म्हणून शिवसेने सोबत युती केली आहे. त्यामुळे इथून पुढील काळात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका एकत्र लढतील.
