Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

चांदणी चौक वाहतूक कोंडी; पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

पुणे: चांदणी चौकात  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीला पुणेकर वैतागले आहेत. आज त्याचा भडका उडल्याचे बघायला मिळाले, कारण आज नागरिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवत जाब विचारला. 

पुणेकरांचा संताप बघून  मुख्यमंत्र्यांनीही लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरुन संपर्क केला आणि उद्या सकाळी 11 वाजता येथील वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यास सांगितले. एवढेच नाहीतर प्रवाशांचा प्रश्न मार्गी लावा असे आदेशही दिले.  मुख्यमंत्र्यांनी दाखल घेत अधिकाऱ्यांना कामाला लावले असले तरी पुणेकरांना खरेच या कोंडीतून सुटका मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 

शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याकडे निघाले होते. दरम्यान, पुण्यातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. 
मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाशांची समस्या दूर करण्यास सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे उद्या वाजता चांदणी चौकात संबंधित सर्व स्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत यानंतर प्रवाशांची समस्या कशी सोडवणार याचा अहवाल ही मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading