Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Pune – 10 गार्डन प्रेमी युगलांसाठी राखीव ठेवा राइट टू लव्ह संघटनेची मागणी


पुणे: पुण्यातील 10 गार्डन हे खास प्रेमी युगलांसाठी राखीव ठेवण्याची मागणी शहरातील राइट टू लव्ह संघटनेने केली आहे. पक्षी निरीक्षण करणाऱ्या नागरिकांना अडथळा होत असल्याने पाषाण तलावाच्या परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे राइट टू लव्ह संघटना आक्रमक झाली आहे. पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा आणि पुण्यातील 10 गार्डन हे फक्त प्रेमी युगलांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणीही राइट टू लव्ह संघटनेच्या वतीने पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचा हा निर्णय बेकायदेशीर असून संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे हा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वकील विकास शिंदे यांनी केली आहे.
विकास शिंदे यांनी सांगितलं की, महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारण 110 गार्डन्स आहेत. तसेच शहरात महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. पुण्यात देशभरातून मुलं-मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येतात. ‘प्रेम’ करणे, हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.
पुणे महानगरपालिकेचा हा निर्णय बेकायदेशीर असून संविधानातील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे हा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वकील विकास शिंदे यांनी केली आहे.
विकास शिंदे यांनी सांगितलं की, महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारण 110 गार्डन्स आहेत. तसेच शहरात महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. पुण्यात देशभरातून मुलं-मुली शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी येतात. ‘प्रेम’ करणे, हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे.
विकास शिंदे यांनी पुढे बोलताना सांगितलं की, कधीच आणि कोणावरही प्रेम केले नाही, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. आधुनिक युगात तरुण-तरुणी बिनधास्तपणे प्रेम करतात. प्रेम करणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रेम करणाऱ्यांचा सन्मान आपण सर्वांनी ठेवला पाहिजे, असं मतही यावेळी शिंदे यांनी मांडलं.
दरम्यान, पुणे शहरात सर्व सुविधा आहेत. मात्र, पुणे महापालिका क्षेत्रामध्ये प्रेम करणाऱ्यांना सुरक्षित ठिकाण उपलब्ध नाहीत. प्रेम करणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरामध्ये प्रेम करणारांसाठी सुरक्षित ठिकाण नाही, ही मोठी खंत असून प्रेम करणाऱ्या प्रेमी युगलांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे, अशी खंतही यावेळी विकास शिंदे यांनी व्यक्त केली. प्रेमी युगलांवर होणारा अन्याय दूर करण्याची जबाबदारी महानगरपालिकेचे आयुक्तांची आहे. त्यामुळे त्यांनी या सर्व प्रकाराची दखल घेणं आवश्यक आहे, असंही शिंदे म्हणाले आहेत.
वास्तविक, पुण्यातील ‘राईट टू लव्ह’ ही संस्था प्रेमाचे समर्थन करते. तसेच प्रेम करणे हा प्रत्येकाचा मुलभूत, नैसर्गिक अधिकार आहे. हा अधिकार प्रत्येकाला कोणत्याही अडथळया शिवाय उपभोगता आला पाहिजे ही या संस्थेची भूमिका आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात 10 ‘गार्डन्स’ ‘कपल गार्डन्स’ म्हणून घोषीत करावेत. तसेच महानगरपालिकेने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द न करावा. अन्यथा राइट टू लव्ह संघटनेच्या वतीने महानगरपालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading