Wednesday, May 13, 2026
BusinessLatest News

सायबरनेटीक  तर्फे महाराष्ट्रातील रायगड येथे  ५ वे उत्पादन युनिट सुरू

पुणे : औद्योगिक ऑटोमेशन फर्म सायबरनेटीक  गोवा-मुंबई महामार्गाजवळविले भागड एमआयडीसी मध्ये एक नवीन उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. २० एकर वर पसरलेल्या जागेत नवीन प्रकल्प ८०,००० चौरस मीटर क्षेत्रफळ व्यापेल. १२० कर्मचार्‍यांसहनवीन प्रकल्पाची उत्पादन क्षमता १५ पटीने वाढणार आहे. पुणे आणि नडियादमध्ये सध्या असलेल्या चार विद्यमान युनिट्स व्यतिरिक्त हे कंपनीचे पाचवे उत्पादन युनिट असेल.

१९८९ मध्ये स्थापन झालेली कंपनी अन्नकृषीऔषधनिर्माण, रसायने आणि इतर उत्पादन उद्योगांसाठी एंड-टू-एंडटर्नकी ऑटोमेशन सिस्टमचे डिझाइनिंगउभारणी आणि इन्स्टॉलेशन करते.

नवीन प्रकल्पाच्या स्थापनेबद्दल माहिती देताना सायबरनेटिकचे सह-संस्थापक आणि संचालक महेश वागळे म्हणाले, “एक विकासाभिमुख कंपनी म्हणून आम्ही अनेक बाजारपेठांमध्ये आमच्या कामकाजाचा विस्तार करत आहोत. नवीन मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ तसेच विमानतळ आणि बंदरासाठी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी पाहता नवीन प्रकल्प अमेरिका आणि इतर निर्यात बाजारांना सेवा पुरविण्यात मदत करेल. दर्जेदार उत्पादनांची वाढती मागणी हे स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेसाठी रोबोटिक्स एकत्रित करण्याच्या वाढत्या प्रवाहाला चालना देणाऱ्या महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वीभारतीय उद्योगांमध्ये देशात १०० पेक्षा कमी रोबोट तयार केले जात होते. सध्या आपल्याकडे दरवर्षी ५,००० ते ६,००० रोबोट तयार केले जात आहेत. त्याहीपुढे जाऊन मानवी प्रक्रियांमध्ये कामगार दलासाठी जास्त जोखीम असताना आश्वासक कंपन्या त्रुटी-मुक्त सुरक्षित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी स्वयंचलित प्रक्रिया स्थापित करतात. या प्रवाहाला चालना देणे हा आमच्या नवीन प्रकल्पाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता.”

ईव्ही बॅटरी असेंब्लीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासह अन्न प्रक्रियाऑटोमोटिव्ह आणि इतर नॉन-स्टँडर्ड उत्पादने स्वयंचलित करण्यासाठी अनेक प्रणाली आणि प्रक्रियांच्या विकासामध्ये सायबरनेटिक सक्रियपणे सहभागी आहे. त्याअनुषंगाने त्यांनी हर्षे, सिप्ला, जीएसके, टाटा मोटर्स, टीव्हीएस, डॉ. रेड्डी, गोदरेज, हिंदुस्तान युनीलिव्हर, पिडीलाईट, आयटीसी आणि हिमालय यासारख्या आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यांनी एबीबी, मित्सुबिशी, et al सह जगातील काही मोठ्या रोबोटिक उत्पादकांसोबत देखील काम केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading