Friday, May 15, 2026
BusinessLatest News

जावा- येझदी रोडस्टर रेन्जचा विस्तार, दोन नवे आकर्षक रंग

पुणे : येझदीच्या पुनरागमनासाठी श्रेणीबाबत पुनर्विचार केला जात होता तेव्हापासून जावा-येझदी मोटारसायकल्समध्ये एक विचार पक्का झाला होता – ब्रँडची सच्ची वृत्ती परत आणायची आणि ब्रँड ज्यासाठी निर्माण करण्यात आला आहे ते सर्व व इतर अनेक विचार प्रत्यक्षात साकार करणारी मॉडेल्स प्रस्तुत करायची. येझदी ऍडव्हेंचरस्क्रॅम्बलर आणि रोडस्टर ही मॉडेल्स म्हणजे साहसदिलखुलास मौजमजा आणि थरार यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत.

क्लासिक लाईन्स आणि आधुनिक टचेस यांचा परिपूर्ण मिलाप असलेलीअतिशय अनोख्या स्टाईलची मोटरसायकल येझदी रोडस्टर तिच्या अद्वितीय व्यक्तिमत्वाला उठाव देणाऱ्याडार्क व क्रोम थीम्समधील पाच मॅट फिनिश्ड रंगांसह सादर करण्यात आली होती. 

या श्रेणीची रंगत अजून जास्त वाढवण्यासाठी जावा येझदी मोटरसायकल्सने येझदी रोडस्टर रेन्जमध्ये दोन नवे रंग सादर केल्याची घोषणा आज केली. इन्फर्नो रेड आणि ग्लॅशियल व्हाईट हे दोन रंग आता रोडस्टरमध्ये उपलब्ध होणार आहेत. फ्युएल टॅन्कवर ग्लॉस फिनिश आणि संपूर्ण मोटरसायकलवर लक्षवेधी ऑब्सिडीयन ब्लॅक थीम या दोन्ही रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. हे दोन्ही रंग पॅशन स्पेक्ट्रमच्या विरुद्ध टोकांचे असले तरी प्रिमोर्डियलमध्ये इंटरलिंक्ड आहेत. रायडर्सच्या भिन्न वृत्तींना आकर्षित करेल असा हा अनोखा प्रकार आहे.

नव्या अवतारामध्ये सादर करण्यात आलेल्या नवीन येझदी रोडस्टर जोडीचे नामकरण “फायर अँड आईस” असे करण्यात आले आहे.  मने कायमची जिंकून घेण्यासाठी सुसज्ज असलेल्या आयकॉनिक मोटरसायकल प्रस्तुत करून ब्रँडने निसर्गातील प्रभावी शक्तींना नमन केले आहे.  रोडस्टरचा उपजत गुणधर्म म्हणजे उत्तेजना जागृत करण्याचे काम या मोटरसायकल अतिशय खुबीने करतात.  दोन्ही मोटरसायकल्सची किंमत २,०१,१४२ रुपये आहे (एक्स-शोरूमदिल्ली)

रोडस्टर परिवारात दोन नव्या सदस्यांचे स्वागत करताना क्लासिक लिजेंड्सचे सीईओ श्री. आशिष सिंग जोशी म्हणाले, “आमच्या Kommuniti मध्ये रायडर्सना आकर्षित करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये येझदी रोडस्टर हे एक लक्षणीय यश आहे.  लॉन्च करण्यात आल्यापासून हे आमचे एक सर्वात लोकप्रिय मॉडेल ठरले आहे.  आजवर या मॉडेलने देशभरातील कितीतरी रायडर्सना अगणित साहसांमध्ये व अनुभवांमध्ये साथ देऊन आपल्या ट्रू-ब्ल्यू रोडस्टर गुणधर्माचे पुरेपूर पालन केले आहे.  इन्फर्नो रेड आणि ग्लेशियल व्हाईट या दोन नव्या रंगांनी आमच्या रोडस्टर रेन्जमध्ये नव्या ऊर्जेचा संचार केला आहे. या दोन नव्या रंगांमुळे ही श्रेणी आता अजून जास्त उठावदार दिसेल व अधिकाधिक रायडर्सना स्वतःकडे आकर्षित करेल.”  

ते पुढे म्हणाले, “या मोटरसायकलमधून मिळणारा अस्सल रोडस्टर‘ अनुभव हा मात्र अजिबात बदललेला नाही. येझदी रोडस्टर म्हणजे क्लासिक रोडस्टर‘ मोटरसायकलचे सर्वोत्तम उदाहरण आहे.  अस्सलरांगडाप्रमाणबद्ध फॉर्म आणि सक्षम चेसिसमध्ये माउंट करण्यात आलेले पोटेंट इंजिन शहरांमधील गर्दीत आणि लांबलचक हायवेजवर देखील उत्तम कामगिरी बजावते.”

येझदी रोडस्टरमध्ये लिक्विड-कूल्डफ्युएल इंजेक्टेडडीओएचसी सिंगल सिलिंडर ३३४सीसी इंजिन आहे जे ७३०० आरपीएमला सर्वाधिक २९.७ पीएस पॉवर व ६५०० आरपीएमला २९ एनएम टॉर्क प्रदान करते.  त्यामुळे शहरांमध्ये व हायवेजवर देखील दमदार कामगिरी बजावली जाते. या इंजिनमध्ये ६-स्पीड ट्रान्समिशन आहे ज्यामध्ये सहज सुरळीत शिफ्ट्ससाठी स्टॅंडर्ड असिस्ट अँड स्लीपर क्लच देण्यात आला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading