Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

साठीत चढली प्रेमाची नशा; शेजारणीला केले प्रपोज, विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे :  एखाद्या तरूणाने तरूणीला प्रपोज केल्यानंतर  केल्यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तर नवल नाही.  मात्र पुण्यात एक वेगळी घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शेजारी राहणार्‍या 51 वर्षीय महिलेला प्रपोज केल्याचा, अश्लील गाणी म्हणून तिला त्रास दिल्याने त्याच्यावर येरवडा पोलिसांनी  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी संबंधीत 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 51 वर्षीय शेजारी राहणार्‍या महिलेनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला संशयीत आरोपी हा 60 वर्षाचा असून त्याला दारूचे व्यसन आहे. दोघांमध्ये पूर्वीपासूनचे वाद आहे. दि. 22 ऑगस्ट रोजी संशयीत आरोपी फिर्यादीच्या घरासमोर आला. त्याने फिल्मी अंदाजात 51 वर्षीय महिलेला तु खुप सुंदर दिसते, मला खुप आवडतेस, आपण दोघे फिरायला जावू म्हणत तिला प्रपोज केले. तसेच त्याने अश्लील हावभाव करून आपण मज्जा करून म्हणत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

तसेच तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. महिलेनी त्याला तुम्ही तुमच्या घरात जाऊन झोपा, मला त्रास देवू नका म्हणल्यानंतर तिला अश्लील भाषेत शिव्या दिल्या. तसेच महिलेा ऐकु येईल अशा जोरदार आवाजात अश्लील गाणी म्हणून तिला त्रास दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात दोघांमध्ये जागेवरून वाद असून याप्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading