Wednesday, May 13, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘३४व्या पुणे फेस्टिवला’ दोन सप्टेंबर पासून होणार सुरूवात

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन 

पुणे : कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत क्रीडा यांचा मनोहरी संगम असणारा पुणे फेस्टिवल सांस्कृतिक महोत्सव यंदा ३४ वे वर्ष साजरे करत आहे. याचे उद्घाटन दोन सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी ही माहिती दिली. यावेळी फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉक्टर सतीश देसाई, पी इनामदार हे उपस्थित होते.

कृष्णकुमार गोयल म्हणाले, या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. या सोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हे देखील याप्रसंगी उपस्थित राहतील. अभिनेत्रे सुनील शेट्टी उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील. यंदा पुणे फेस्टिवल मध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्यविभूषण शिवकुमार शर्मा, पद्धविभूषण अभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, अभिनेत्री नृत्यांगना, खासदार हेमामालिनी यांचा ‘गंगा बले’ अशोक हांडे यांचा ‘आजादी 75 आजादी का अमृत महोत्सव’ हे कार्यक्रम होणार आहेत. तसेच शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची संगीत मैफिल आणि मीस पुणे फेस्टिवल स्पर्धा कार्यक्रम
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होतील.

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथेही विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बालगंधर्व कलादान येथे महिलांची चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, पंडित जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन येथे उगवते तारे, इंद्रधनु आणि हॉटेल तरवडे कलर्स येथे महिलांची पाक कला स्पर्धा, जपानी व मंगळागौरी खेळ यासोबतच पुणे शहरात विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading