Wednesday, May 13, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ’; वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

पुणे : राज ठाकरेंनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आलेले आणि त्याच काळात पुणे शहराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले होते. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वसंत मोरेंवर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केलीये.

राज ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघात महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात मनसेचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष वसंत मोरे यांचीही पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांच्यासह वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीये.

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “साहेबांनी सांगितले ना तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ… कारण मराठ्याची जात कधी माघ पुढं बघत नाय… आणि हो, बारामती लोकसभा म्हणजे फक्त बारामती नाय बाबांनो! त्यात भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली, दौंड, इंदापूर आणि पुणे शहर हेही आहे बरं का! म्हणून तर म्हणलो मी येतोय,असं वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0HjzLNpHFfEDoZGpGqZVzeXWe6rDaStkkRJZ76HrMJhUCKeU9YrgpVBbTFxcPVGZKl&id=100044231363898&sfnsn=wiwspwa

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading