जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी नक्कीच उभी राहील – पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे
पुणे : काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम सुरू आहे. जनता आता कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असा विश्वास पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.
येरवड्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित “बांधकाम मजूर शैक्षणिक अनुदान व साहित्य (किट)वाटप” कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पूजा आनंद, माजी नगरसेवक जॉन पॉल राजेंद्र शिरसाट, अरुण वाघमारे, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, कार्यक्रमाचे संयोजक महिला काँग्रेस सरचिटणीस ज्योती चंदेवळ व शहर काँग्रेसचे सरचिटणीस विल्सन चंदेवळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 26 लाख 75 हजार रकमेचे बांधकाम मजूर यांच्या पाल्यांसाठीचे शैक्षणिक अनुदान तसेच 1080 बांधकाम मजुरांना सुरक्षा साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
लोकप्रतिनिधी नसताना देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रामाणिक काम येरवड्यात सुरू आहे. जनता त्यांच्या सोबत असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना नक्कीच संधी मिळेल असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केला.
माजी आमदार मोहन जोशी यांनी देखील चंदेवळ यांच्या कार्याचा गौरव करून नागरिकांसाठी पूर्णवेळ कार्य केल्यामुळे पक्षाची संघटना देखील येरवडा परिसरात बळकट होत असल्याचे यावेळी सांगितले. ज्योती चंदेवळ यांच्या माध्यमातून येरवडा परिसरातील महिलांचे चांगलं संघटन उभे केले असून पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात त्यांना नक्कीच योग्य संधी मिळेल विश्वास महिला अध्यक्ष पूजा आनंद यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे काम घराघरात पर्यंत पोहोचवून संघटना बळकट करावी असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांनी यानिमित्ताने केले. यावेळी राकेश चौरे, बाबा नायडू, विनय माळी, मेहबूब नदाफ, गणेश कांबळे, समीर शेख, केशव जाधव, लक्ष्मी गायकवाड, रिफेन्स अल्फान्झो, सिरील आशीर्वादम, पुरुषोत्तम अल्हाट यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती चंदेवळ यांनी केले सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड तर आभार विल्सन चंदेवळ यांनी मानले.
