एनईएमएसमध्ये देशभक्तिपर कार्यक्रम
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एनईएमएस पूर्व-प्राथमिक शाळेत ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांतून भारत मातेला वंदन केले. विविधतेतून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतरचे सुराज्य जपण्याची, ज्ञानाची ज्योत पेटविण्याची आणि स्वच्छता राखण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. गरवारे बालभवनच्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मर्चंट, प्रतिभा गुरव आणि शिक्षकांनी संयोजन केले.
