स्पर्धा परीक्षेचा निकाल लागून देखील नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे भीक मांगो आंदोलन
पुणे : सुमारे साडे तीन वर्ष निवड प्रक्रियेत भरडलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – 2019 च्या विद्यार्थ्यांना निकाल लागून 4 महिने उलटून देखील नियुक्ती देण्यात आलेली नाहिये. या निषेधार्थ निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्काच्या नियुक्तीसाठी “भीक मागो” व “लोटांगण आंदोलन” केले.
दरम्यान, यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देऊन देखील 1143 निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम व मृदा व जलसंधारण विभागाने फक्त पानं पुसण्याच काम केल आहे. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचा रोष अती होवून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उमेदवारांना तात्काळ नियुक्तीची तारीख कळावी म्हणून मागणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे समन्वय निखिल देसले, सागर दरेकर, विनायक देसाई, आकाश परदेशी व वैभव ढाकणे ह्यांच्या मार्गदर्शनखाली शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पडले. त्यावेळी MPSC समन्वय समितीचे महेश बडे देखील उपस्थित होते.
