Thursday, May 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महाविकास आघाडी फुटलेली नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडी फुटलेली नाही, आम्ही अजूनही एकत्रच आहोत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधिमंडळात बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी फुटलेली नसून आम्ही अजूनही एकत्रच आहोत. पुढे काय निर्णय घ्यायचा हे येणाऱ्या काळत सांगेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

.. पण जनता पाहतीये 

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण आदेश दिले आहे. शिवाय याचिकांच्या सुनावणीला तारीख पे तारीख मिळत असून पुढील सुनावणी ही 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, नायदेवतेने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. पण जनता सर्व पाहत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading