मराठी भाषेतील फलक लावावे यासाठी एकीकरण समितीचे मानाच्या गणपतींना निवेदन
पुणे : लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना संघटित करण्यासाठी सामूहिक गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास भर दिली याचा आदर्श मानून मराठी भाषेविषयी मराठी जनामध्ये तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी जनांच्या मनात मराठी भाषेसाठी आत्मियता जागावी यासाठी त्या आशयाचे फलक पुणे शहरातील मंडळानी लावावे म्हणून मराठी एकीकरण समितीच्या पुणे शहर यांच्या वतीने मानाच्या गणपतींना निवेदने देण्यात आले.
कसबा, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग,शारदा गणेश,दगडुशेठ या सर्व गणपती मंडळाना हि निवेदन देण्यात आली. तसेच इतर मंडळानिही मराठी भाषा जनजगृतीचे फलक प्रथमदर्शनी भागात लावावे, अशी विनंती पुणे शहर अध्यक्ष रवींद्र नामदेव कळमकर यांनी केली
यावेळी सर्वश्री रवींद्र नामदेव कळमकर, राजन पंदारे,रिकिल ओहाळ,स्वप्निल जाधव, अमोल नेवसे हे उपस्थित होते.
