Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास अधिक आनंद खासदार गिरीश बापट यांचे वक्तव्य

पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी लोकसभा निवडणूक ही पुण्यातून लढवावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत . फडणवीस यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास अधिक आनंद होईल. असे वक्तव्य पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

त्यांच्या वक्तव्यामुळे पुण्यातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. गिरीश बापट म्हणाले,मात्र जर संघटनाच उमेदवार द्यायला लागल्या तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर संघटनांनी त्यांना जे योग्य-अयोग्य वाटतं. त्याप्रमाणे प्रचार करावा .अशी टिपणी बापट यांनी केली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर महाविकास आघाडीने घेतलेल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी चार चा प्रभाग निर्णय बदलला. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तिनचा प्रभाग होणार आहे. त्यामुळे येणारी महानगरपालिका निवडणूक ही उशिरा होणार आहे. त्यावर गिरीश बापट म्हणाले,राज्यात दोन सरकार आली आणि दोन्ही सरकारांनी प्रभाग रचनेचा वेगवेगळा निर्णय घेतला.आता नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा प्रभाग रचना बदलली आहे.यामध्ये निवडणूक आयुक्त,सरकार आणि कोर्ट अशा तिन्ही एजन्सी येतात त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होतील यामध्ये थोडासा गोंधळ आहे.कुठल्याही सरकारने एकही निर्णय घेतला की दुसरा कोर्टात जातो.निवडणुकीसाठी किती खर्च झाला याचा आकडा मला माहिती नाही .पण आपले शहर मोठे आहे खर्च होणारच. असे गिरीश बापट म्हणाले.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे व भाजप युती करणार का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर बापट म्हणाले,आमची आणि खरी शिवसेना जी शिंदेंची आहे. त्यांची युती पुणे महापालिकेत नक्की होईल. असे गिरीश बापट म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading