पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान करा अर्ज
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२१ वा पदवी प्रदान समारंभ लवकरच घेण्यात येणार असून यासाठी ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी दिनांक २२ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीत विद्यापीठाच्या convocation.unipune.ac.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज करावेत. अर्जाचा नमुना, शुल्क आदीबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिली आहे. पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून देण्यात आली आहे.
