Tuesday, May 5, 2026
Latest NewsPUNE

डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’

पुणे – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पूर्व प्राथमिक शाळेत ‘गॅझेट फ्री दहीहंडी’चे (खेळांची दहीहंडी) आयोजन करण्यात आले होते.

क्रिकेट, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, फूटबॉल, बॅडमिंटन, पॅराशूट, फ्लाईंग रिंग, ट्रॅम्पोलिन, ब्रिज बॅलन्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, मोठी सापशिडी अशाप्रकारच्या विविध खेळांच्या साहित्याने दहीहंडीची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी कृष्ण-राधेच्या पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या.

विविध प्रकारच्या गॅझेटस् पासून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी आणि मैदानी व बैठ्या खेळांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनवासी कल्याण आश्रमाला धान्य देण्यात आले. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading