पुण्यात मेट्रो प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणार- ब्रिजेश दीक्षित
पुणे:मुंबई प्रमाणे पुण्यातही भुयारी मेट्रोचे काम सुसाट सुरु आहे. लवकरच पुण्यातील भुयारी मेट्रोची चाचणी होणार आहे. रेंज हिल ते स्वारगेट या भुयारी मार्गच काम अंतिम टप्प्यात आहे.पुणे मेट्रो प्रकल्पाच काम प्रगतीपथावर आहे. मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आयोजित पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यात 15 ऑगस्टला 88 हजार पुणेकरांनी मेट्रो प्रवास केला. पुण्याची जशी सांस्कृतिक शहर म्हणून ओळख आहे. आत्ताच हे पुण शहर मेट्रो सिटी म्हणून सुद्धा ओळख होणार आहे. हा भुयारी मेट्रो प्रकल्प पुणेकरांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. असे ब्रिजेश दीक्षित म्हणाले.
ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पुणे मेट्रोचा हा भुयारी मार्ग न्यायालयापासून मुठा नदीच्या पात्रातून बुधवार पेठेकडे गेला आहे. या मार्गात स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, न्यायालय तसेच शिवाजीनगर अशी पाच स्थानके आहेत.
जगभरातील मेट्रो प्रकल्प तोट्यात असले तरी पुण्यातील मेट्रो प्रकल्प पांढरा हत्ती ठरणार नाही असा विश्वास महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे. पुणे मेट्रो प्रकल्पाच काम प्रगतीपथावर असून मार्च 2023 पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाला आलेला असेल. त्यातील रेंज हिल्स स्टेशन तसेच सिव्हील कोर्ट जंक्शनचं काम पुढील 3 महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगीतले.
ब्रिजेश दीक्षित म्हणाले,पुणे मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा 33.1 किमी लांबीचा आहे. यात वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांचा समावेश आहे. सध्या, या दोन मार्गांवर मेट्रो अंशतः कार्यान्वित आहे – वनाज ते गरवारे कॉलेजपर्यंत 5 किमीची लाइन आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडीपर्यंत 7 किमीची दोन मार्गांवर पाच मेट्रो स्टेशन आहेत. मार्च 2023 पर्यत पुण्यात मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण होतील. विस्तारित मार्गांचा आराखड महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठवला असल्याचेही दीक्षितांनी सांगीतले.
