गोपाळकृष्ण शाळेत दहीहंडी उत्सव साजरा
पुणे : गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण,राधा,गोपिका यांचा पेहराव विद्यार्थ्यांनी केला होता. यावेळी दहीहंडी उत्सव विशेष चित्ररंगभरण स्पर्धा घेण्यात आली. बालकृष्णाचे चित्रे विद्यार्थ्यांनी विविध रंगांनी रंगवली. सदर स्पर्धेत इयत्ता पहिलीतून प्रथम-श्रेया वाघमोरे,व्दितीय-निशा धोत्रे,तृतीय-अजाण शेख,दुसरीतून प्रथम- समीक्षा रेवडे , व्दितीय-आहाना शेख,तृतीय- साई अलकुंटे, तिसरीतून प्रथम-तनुष्का येरवडे,द्वितीय-सानिया शेख,तृतीय-प्रगती अवघडे, चौथीतून प्रथम-अमृता भेंडे,व्दितीय-रूपाली कुऱ्हाडे,तृतीय-समीक्षा नडगेरी क्रमांक पटकावले. दहीहंडी उत्सवाचे नियोजन गीतांजली कांबळे व दिपाली गावडे यांनी केले.तसेच चित्ररंगभरण स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. यावेळी मंदाकिनी बलकवडे,रणजित बोत्रे,विशाल चव्हाण उपस्थित होते.
