Saturday, October 24, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विनायक मेटे यांचा शिक्रापूर पर्यंत पाठलाग करणारी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात

पुणे:शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूवरुन शंका व्यक्त केल्या जात आहेत.
त्यातच मेटे यांच्या दुसऱ्या चालकाने मेटे यांच्या मृत्यूपूर्वी 3 ऑगस्टच्या रात्री विनायक मेटे यांच्या कारचा पाठलाग झाल्याचा दावा केला होता. यामुळे विनायक मेटे यांच्या मृत्यूचे गूढ वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.
विनायक मेटे यांच्या कारचा शिक्रापूरदरम्यान पाठलाग करणारी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या कारमध्ये चालकासह 6 जण असल्याची माहिती समोर आली आहे. 3 ऑगस्टला विनायक मेटे यांच्या एका कार्यकर्त्यासह पुण्याच्या दिशेने येत असताना त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले होते.
यासंदर्भात पोलिसांनी अशी माहिती दिली की , गाडीचा मालक आणि चालक संदीप वीर याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. कारमधील सहापैकी एकाचा वाढदिवस असल्याने ते शिरुरला गेले होते. त्यांचे नातेवाईकदेखील शिरुरमध्ये आले होते, अशी माहिती चौकशीमधून समोर आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading