fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNESports

‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीमध्ये  उज्वल कुमार, आयुष वर्पे, रिचा बिश्त, शादृल जावळकर विजेते

पुणे : वैंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटी, केशवनगर तर्फे आयोजित १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मिनी मॅरेथॉन’ शर्यतीमध्ये उज्वल कुमार, आयुष वर्पे, रिचा बिश्त आणि शादृल जावळकर यांनी प्रथम क्रमांकासह विजय मिळवला.

भारतीय देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आणि या अमृत महोत्सवदिनाच्या निमित्ताने वैंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटीच्या वतीने मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. केशवनगर येथील सोसायटीपासून या मिनी मॅरेथॉनला सुरूवात झाली. केशवनगर येथील मुख्य रस्त्यापासून रेणूका माता मंदिर रस्त्यावील रेणूका माता मंदिर येथे पहिला टप्पा पूर्ण करून, रेणूका माता मंदिर पासून पुन्हा वैंकटेश सोसायटीपर्यंत असा २ किमीचा टप्पा पूर्ण करून शर्यतीचा समारोप, असा या शर्यतीचा मार्ग होता.

५०० मीटर धावणे या ५ ते १० वयोगटात उज्वल कुमार (१: मि.) याने पहिला क्रमांक मिळवला. आरूष यादव याने दुसरा तर, आर्यन वर्पे याने तिसरा क्रमांक मिळवला. या शर्यतीचे हे उद्धघाटनाचे वर्ष होते व निरोगी आरोग्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी याचे आयोजन केले गेले होते.

१ किलोमीटर धावणे कुमार (११ ते १८ वर्ष) गटात आयुष वर्पे याने ७.०० मिनिटे या वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. प्रीत पांचाळ याने दुसरा तर, गीत वाजा याने तिसरा क्रमांक मिळवला. महिला गटामध्ये रिचा बिश्त हिने ९: मिनिट वेळ नोंदवित अव्वल क्रमांक मिळवला. राधिका पाटरीकर हिने दुसरा आणि डॉ. पुजा शहा हिने तिसरा क्रमांक मिळवला.

२ किलोमीटर धावणे पुरूष गटामध्ये शादृल जावळकर याने ११: मिनिट ही वेळ गाठत पहिला क्रमांक मिळवला. राजेशकुमार वजा याने दुसरा तर, स्वप्निल धारीया याने तिसरा क्रमांक मिळवला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण चंचलाताई कोद्रे स्पोर्ट्सचे संचालक संदीपदादा कोद्रे, सहसंचालक तेजस कोद्रे, संदीपदादा लोणकर, विठ्ठल लोणकर, मनोहर लोणकर, प्रशांत अवांतकर, प्रसाद म्हात्रे, सिचन दोकाके, महेश धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या धावपटूंना करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. तसेच स्पर्धेतील विजेत्या धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात येणार असून सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना प्रमाणपत्र देण्यात आली.

स्पर्धेचा निकालः ५०० मीटर धावणेः ५ ते १० वयोगटः
१) उज्वल कुमार (२: मि.), २) आरूष यादव (२: मि.), ३, आर्यन वर्पे (२: मि.);

१ किलोमीटर धावणेः
कुमार गटः ११ ते १८ वर्षः १) आयुष वर्पे (७.०० मि.), २) प्रीत पांचाळ (७: मि.), ३) गीत वाजा (८: मि.);
महिला गटः १) रिचा बिश्त (९: मि.), २) राधिका पाटरीकर (९: मि.), ३) डॉ. पुजा शहा (९: मि.);

२ किलोमीटर धावणेः पुरूष गटः
१) शादृल जावळकर (११: मि.), २) राजेशकुमार वजा (११: मि.), ३) स्वप्निल धारीया (१२: मि.).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading