Thursday, May 14, 2026
BusinessLatest News

रिबेल फूड्सचे फाउंडर – जयदीप बर्मन यांचे चर्चासत्र संपन्न

पुणे : नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) च्या पुणे चॅप्टर ने जयदीप बर्मन- को फाउंडर आणि सीईओ रिबेल फूड्स यांच्या एका खास चर्चासत्राचे आयोजन केले होते ज्यासाठी पुण्यातील १२० हून अधिक प्रमुख रेस्टॉरंटर्स आणि एफ एण्ड बी ब्रँड मालक उपस्थित होते.

डॉटपे समर्थित या कार्यक्रमाचे आयोजन वन लाउंज, कोरेगाव पार्क, येथे करण्यात आले होते यावेळी जयदीप बर्मन यांनी आपल्या कंपनीच्या संपुर्ण प्रवासाबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली.   एनआरएआए ही देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये चॅप्टरच्या स्वरूपात अस्तित्वात असलेली संस्था आहे, जी ५,००,००० हून अधिक रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांना त्यांचे ब्रँड आणि व्यवसाय एकत्रितपणे वाढविण्यात मदत करते. त्याचप्रमाणे, एनआरएआय पुणे चॅप्टर सदस्यत्वाचा विस्तार करून , अतिथींना शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी देऊन शहरात अद्वितीय समुदाय निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.   एनआरएआय पुणे चॅप्टर ने अलीकडेच अनुराग कटारिया (संस्थापक आणि एमडी, इंडिगो हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड) यांच्यासोबत आपल्या पहिल्या मास्टरक्लासचे (ओन यूवर रेस्टॅरेंट ब्रॅण्ड) आयोजन केले होते आणि आता एनआरएआय पुणे चॅप्टरने जयदीप बर्मन यांच्या सोबत दूसर्या सत्राचे आयोजन केले होते ज्याला सर्वांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात जयदीप बर्मन भारतीय बाजारपेठेस काही काळापासुन आकर्षीत करणार्या पिझ्झा- बर्गर सारख्या रोल्सची व्यावसायीक विक्री करण्याच्या कल्पनेपासून ते या क्षेत्रातील त्यांच्या संपुर्ण प्रवासाची तपशीलवार माहिती दिली,फासोसची मोठी वाढ रिबेल फुड्सद्वारे झाली आहे. जी आता जगातील सर्वात मोठी इंटरनेट फूड कंपनी बनली असून, तिचे देश-विदेशात अनेक नामांकित स्टेकहोल्डर्स आहेत.रिबेल फूड्सची सुरुवात पुण्यात झाली आणि गेल्या काही दशकांमध्ये ते अनेक देशांमधील ४५०० हून अधिक स्टोअर्सपर्यंत वेगाने वाढले आहे.फासोस, अव्हन स्टोरी, , बेहरूझ बिर्याणी सारखे ब्रँड्स हे रिबेल फूड्सच्या विशाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर कसे कार्यरत आहेत याची देखील माहिती त्यांनी या चर्चासत्रात दिली. यावेळी चॅप्टर हेड- प्रफुल्ल चंदावरकर (, मलाका स्पाइसचे मालक) म्हणाले, जयदीप बर्मनसोबतचा ‘जर्नी टू द टॉप’ हा कार्यक्रम एनआरएआय मीट मधील सर्व तरुण रेस्टॉरंट मालकांसाठी खास होता. अनुभवी आणि यशस्वी व्यक्तीकडून अनेक अद्भुत गोष्टी ऐकण्यासाठी एनआरएआय पुणे चॅप्टरने उपलब्ध करून दिलेली एक अनोखी संधी होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading