fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

जीआयआयएसच्‍या विद्यार्थ्‍यांनी स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्त साजरी केली ‘हर घर तिरंगा’ मोहिम

पुणे: जीआयआयएस हडपसरच्‍या विद्यार्थ्‍यांनी शाळेमध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव सोहळा ‘आजादी का अमृत महोत्‍सव’ उपक्रमात सहभाग घेतला. देशाला ब्रिटीशांकडून मिळालेल्‍या स्‍वातंत्र्याला ७५ गौरवशाली वर्षे पूर्ण झाली, ज्‍याचे साजरीकरण म्‍हणून हा सोहळा आयोजित करण्‍यात आला.

साजरीकरणाच्‍या भावनेसह विद्यार्थ्‍यांनी सरकारच्‍या ‘हर घर में तिरंगा’ उपक्रमाचा भाग म्‍हणून त्‍यांच्‍या आर्ट व क्राफ्ट क्‍लासमध्‍ये ‘तिरंगा’ ध्‍वज तयार केला. हा उपक्रम सामान्‍य नागरिकांना त्‍यांच्‍या घरांमध्‍ये तिरंगा ध्‍वज फडकवण्‍याचे आवाहन करतो. विद्यार्थ्‍यांनी त्‍यांची ही कलाकृती घरी नेत सर्वांना दाखवली.

विद्यार्थ्‍यांनी इतर विविध कार्यक्रमांमध्‍ये देखील सहभाग घेतला, ज्‍यामधून त्‍यांना स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली. त्‍यांनी विविध राज्‍यांचे पारंपारिक पोशाख परिधान केले आणि देशाची विविधता दाखवण्‍यासाठी संबंधित राज्‍यांच्‍या भाषांमध्‍ये काही ओळी म्‍हटल्‍या. विद्यार्थ्‍यांनी ‘फ्रीडम वॉक’ देखील केला, जेथे त्‍यांनी आपल्‍या देशाचे स्‍वातंत्र्यसेनानी किंवा राष्‍ट्रीय चिन्‍हांप्रमाणे पोशाख परिधान केले. त्‍यांनी स्‍वातंत्र्यसेनानीच्‍या दोन प्रसिद्ध वाक्‍यांचे वर्णन केले आणि राष्‍ट्रीय चिन्‍हांचे महत्त्व सांगितले.

तसेच चित्रकला स्पर्धा, १९४७च्या स्वातंत्र्यानंतर भारताने मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीचे पोस्टर बनवण्याचा उपक्रम दिवसभर घेण्यात आला.

याप्रसंगी जीआयआयएस इंडियाच्‍या कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, ”तिरंगा मोहिमेमध्ये राष्‍ट्रध्वजाशी असलेले नाते केवळ औपचारिक न ठेवता अधिक वैयक्तिक बनवण्याची संकल्पना आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये राज्य व देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले योगदान व बलिदानाबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि तरुण पिढीमध्ये देशभक्‍ती जागृत होईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading