fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण संपन्न

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पडले.आदरणीय शरद पवार साहेब यांचे वर्गमित्र व सहकारी . विठ्ठल मणियार यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यासाठी पुणे शहर कार्यकारणीतील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

या निमित्ताने बोलताना प्रमुख अतिथी श्री.विठ्ठलशेठ मणियार यांनी सर्वांना अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश विविध धर्म,भाषा , प्रांत अशी वैविध्यपूर्ण संस्कृती असणारा देश आहे.
अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे,त्यांच्या बलिदानाची आठवण करत त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण राष्ट्रीय उत्सव साजरे करत असतो.
भारत देश भौगौलिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधतेनं नटलेला, विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती, लोककला, लोकसंस्कृती व इतिहासाचा गौरवशाली वारसा लाभलेला समृद्ध देश आहे. देशाची विविधता हीच देशाची खरी शक्ती आहे. सशक्त, समर्थ, समृद्ध, बलशाली भारत आपल्याला घडवायचा आहे. कोट्यवधी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखणं, भारतीय राज्यघटना, लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं, त्यांना बळकट करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यं आहे. हे कर्तव्य पार पाडत असतानाच देशाची प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचारधारा पुढे नेणं, सर्वधर्मसमभावाचा आदर करीत समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याचा निर्धार करुया.
उत्साह, आनंद आणि देशभक्तीने भारावलेल्या आजच्या या पवित्र दिवशी आपल्या विचारांच्या कक्षा विस्तृत करून लोकशाही अधिकाधिक समृध्द करण्याचा निश्चय करूयात.”असे मत मी त्यांनी व्यक्त केले.

ध्वजारोहण सोहळ्यासाठी शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, ॲड. जयदेव गायकवाड, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख , रवींद्र माळवदकर,महेंद्र पठारे,,श्रीकांत शिरोळे,भगवानराव साळुंके,महेश शिंदे,किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,सुषमा सातपुते,प्रकाश म्हस्के,समीर शेख,संदीप बालवडकर,महेश हांडे,दिपक कामठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading