fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

भारतातील आघाडीची फर्निचर कंपनी रॉयलओक फर्निचर च्या रिटेल स्टोअर चे वाघोली येथे उद्घाटन

पुणे :  भारतातील आघाडीची फर्निचर कंपनी रॉयलओक ने आज वाघोली येथे त्यांच्या पहिल्या फ्लॅगशिप स्टोअरचे उद्घाटन केले. रॉयलओक च्या या स्टोअर मध्ये ग्राहकांना सोफा, रिक्लायनर्स, डायनिंग, एक्स्क्लुझिव्ह मॅट्रेसेस, बेड्स, कुशन्स तसेच ऑफिस आणि आऊटडोअर फर्निचरची भारतीय बाजारपेठेतील संपूर्ण रेंज उपलब्ध होणार आहे.

वाघोली (नगर रोड) येथील पहिल्या स्टोअरच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुण्या सई ताम्हणकर यांनी सांगितले “ हे स्टोअर खूपच विशाल आहे आणि यामध्ये स्टाईल आणि आरामदायकपणा दोन्हीचे मिश्रण असलेले इम्पोर्टेड फर्निचर उपलब्ध आहे. या स्टोअर मध्ये ‍लिव्हिंग, डायनिंग, बेड्स, ऑफिस आणि आऊट डोअर फर्निचर चे विशाल कलेक्शन उपलब्ध आहे.” त्या पुढे हे ही म्हणाल्या की स्टोअरची सुंदरता ही आहे की इकडे जगभरांतून आलेल्या फर्निचरची रेंज ही सर्वोत्कृष्ट किंमतीत उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण शहरांत याचे हे वेगळेपण जाणवते.”

या कार्यक्रमात बोलतांना रॉयलओक चे चेअरमन श्री विजय सुब्रमणियन् यांनी सांगितले “ रॉयलओक चे पहिले ब्रॅन्ड स्टोअर सुरू करतांना आंम्हाला आनंद होत आहे, या स्टोअर मुळे आम्ही आमच्या निष्ठावंत ग्राहकांना उत्पादनांचा अनुभव घेऊन आंतरराष्ट्रीय फर्निचर , होम ॲक्सेसरीज आणि अशा अनेक गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत. भविष्यात आम्ही अशा प्रकारची आणखी काही स्टोअर सुरू करण्याची योजना आखली आहे.”

रॉयलओकचे रिटेल हेड श्री यतीश चंद्रा यांनी पुढे सांगितले “ अनुभवावर आधारीत खरेदी हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे, आमचे स्टोअर हे ब्रॅन्डचा अनुभव देण्यासाठी योग्य पध्दतीने डिझाईन करण्यात आले आहे . ब्रॅन्डचा अनुभव समृध्द करण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्ट करु आणि ग्राहकांशी संभाषणाचे आम्ही महत्त्व जाणतो. आंम्हाला खात्री आहे की याचा उपयोग होईल.”

“ विशाल स्तरावर काम केल्याने आंम्हाला आता वाढीस जागा उपलब्ध झाली असून यामुळे ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होणार आहेत. कंपनी ने नेहमीच ग्राहकांना अजोड किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील फर्निचर उपलब्ध करुन दिले आहे. स्टोअर मधील कर्मचार्‍यांना सुध्दा उत्पादने आणि ग्राहकांच्या गरजांविषयी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे, परिणामी स्टोअर मधील हा अनुभव खूपच समृध्द असेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading