fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

“सार्वजनिक राष्ट्रगीताची” अविवेकी धोषणा करून, शिंदे सरकार कडून ‘राष्ट्रीय सहींतेचा खेळ’…. काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी..!

पुणे : स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सोहळा निमित्ताने पंप्र मोदीं कडून हर घर तिरंगा अभियान देशभर साजरा झाल्यावर, आता नव्याने ‘अचानक हुक्की आल्या प्रमाणे’ राज्यातील ईडी (एकनाथ + देवेंद्र) शिंदे – फडणवीस सरकारने ऊद्या बुधवारी दि १७ ॲागस्ट रोजी सकाळी ठीक ११ वा.. राज्यभर सामुहीक राष्ट्रगीत गाण्याचे (?) आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केल्याचे वृत्त वाहीनी वरील ब्रेकींग न्युज द्वारे कळाले…! हा निर्णय अतिशय उथळपणे, बेजबाबदारपणे, अप्रगल्भतेने घेतला गेल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली …!

सवंग (Cheap publicity) उथळ प्रसिध्दीसाठी, मात्र फक्त १६ तासांच्या पुर्व सुचनेवर, राज्यभर “सार्वजनिक राष्ट्रगीतची” तुघलकी धोषणा करून, शिंदे सरकार कडून राष्ट्रीय सहींतेचा खेळ व राष्ट्रीय भावनेचाअनादर करत आहे…! स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यावर (बैल गेला आणि झोपा केला) जनतेची दिनचर्या सुरू झालेवर, अचानक ‘सामुहीक राष्ट्र गीताचा घाट घालण्याचे प्रायोजन काय..? हे राष्ट्रगीत ऊद्या ११ वा सुरू असतांना, रस्त्यावरील सर्व वाहतुक त्याचवेळी बंद राहणार काय..? ठीक ११ वाजल्याची वेळ भोंग्यांवर जाहीर होणार काय..? अचानक आहे – तिथेच् वहाने थांबवल्यास अपघात होणार नाहीत काय..? स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सप्ताह संपल्यावर.. ‘तुघलकी पध्दतीने’ अत्यंत अपुर्ण वेळेत, राष्ट्रगीत सामुहीक म्हणण्याचे हे फर्मान काढुन, ते यशस्वी न झाल्यास राष्ट्रगीताच्यासंहीतेची पायमल्ली होणार नाही काय..? असे संतप्त सवाल ऊद्याच्या बुधवारी स.११ वा राज्यभर सामुहीक राष्ट्रगीत म्हणण्याच्या निर्णयावर केले.. व राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत या विषयी गांभीर्याने त्यांचे महत्व राखत, त्यांच्या आचार संहितेचे पालन करीतच असे निर्णय व्हावेत..

राष्ट्र भावनेच्या व राष्ट्रीय संहीतेच्या पालना होण्या विषयी सर्वार्थाने साधक बाधक शक्यता लक्षात घेऊनच “राज्यभर सामुहीक गायनाचे” निर्णय व्हावेत..! शिंदे फडणवीस सरकारने अचानकपणे व ऊथळपणे असे निर्णय घेऊन, राष्ट्रगीताची संहीता राखत सामुहीक गायन केवळ अशक्य असल्याने, राष्ट्रीय भावना व संहीतेस तडा जाऊ शकणाऱ्या ‘ऊथळ वल्गना’ करू नयेत.. असा ईशारा देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading