स्वातंत्र्य प्राप्ती साठी ज्यांचे योगदान राहिले आहे त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवणे या यात्रेतून भावना आहे -नाना पटोले
पुणे:काँग्रेस अख्या राज्यभर आजादी गौरव पद यात्रा काढत आहे. त्यावर क्रांती दिवसांपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे पुण्यात आज समाप्त होईल. उद्या मुंबईत मोठी रॅली होणार आहे.
स्वातंत्र्य प्राप्ती साठी ज्यांचे योगदान राहिले आहे. त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवणे या यात्रेतून भावना आहे. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला,माजी आमदार मोहन जोशी ,संगीता तिवारी ,माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक आबा बागुल, काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, दीप्ती चौधरी, नगरसेवक अभय छाजेड, रमेश बागवे, संध्या संवालाखे उपस्थित होते.
मागच्या आठवड्यात काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांनी दहा वर्षानंतर महानगरपालिकेत एका कामासाठी गेले होते. त्यामुळे महानगरपालिकेत चर्चांना उधाण आले. महानगरपालिकेत पत्रकारांच्या प्रश्नावर सुरेश कलमाडी म्हणाले मी पुन्हा येईन. सुरेश कलमाडी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एन्ट्री करणार का त्यावर नाना पटोले म्हणाले, अनेक वर्ष त्यांनी काँग्रेस साठी काम केलं आहे. मी स्वतः सुरेश कलमाडी यांना भेटायला जाणार आहे . असे नाना पटोले म्हणाले.
मोदी यांनी हर घर झेंडा हा उपक्रम राबविला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले,झेंड्याचा सन्मान झालाच पाहिजे .पण सरदार पटेल, महात्मा गांधी, नेहरू असे अनेक जण आहेत .ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्व बलिदान दिले .पण त्यांचे फोटो कुठेच दिसत नाही. अशी टीका नाना पटोले यांनी यांनी मोदींवर केली.
वसंतराव नाईक यांचा विचार जर मोदींनी यातून त्यांनी पोहचवला असता तर अजून आनंद झाला असता . असे नाना पटोले म्हणाले. झेंड्ये हे निष्कृष्ट दर्जाचे आहेत. असा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. त्यावर नाना पटोले म्हणाले,हिरवा रंग खाली असतो हे त्यांना माहिती नाही.चीन मधून पॉलिस्टर मागवले आहे लोकांना आधी २० रुपये द्या आणि झेंडा घ्या असे होते आहे. असे नाना पटोले म्हणाले.
केंद्रातील भाजपच्या खासदारांनी झेंड्याचा सन्मान ठेवला नाही. असे दिसून आले आहे त्यावर नाना पटोले म्हणाले,केंद्रातील भाजप चे खासदार यांना झेंड्याचा सन्मान ठेवता येत नाही. त्यांच्यावर का कारवाई नाही केली .
चीन मधून भारतात झेंडे आयात होत आहेत. एकीकडे भारत चीनची लढाई करत आहे. तर तीन भारताला झेंडे आयात करत त्यावर नाना पटोले म्हणाले, चीन मधून असे झेंडे घेत येत असतील तर मोदी, अमित शहा यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण तिरंग्याचा अपमान होऊ नये. आमची ओळख या धवाजपासून सुरू होते. हा अपमान सरत्याने केला जातो आहे हे काम जर भारतीय कामगारांना दिला असता तर त्यांना रोजगार मिळाला असता . असे नाना पटोले म्हणाले.
