‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. ( Rakesh Jhunjhunwala passes away) ते 62 वर्षांचे होते. त्यांना भारताचे वॉरन बफे असेही म्हणल जात होत. झुनझुनवाला यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. झुनझुनवाला हे शेअर मार्केटमधील अनेक मात्तबर व्यक्तिमत्वांपैकी एक होते. अनेकांनी त्यांच्या टिप्स फ़ॉलो करून शेअर मार्केटमध्ये पैसे कमावले.
काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी सुरु केली होती. प्रवाशांना कमी दरात सुविधा दिल्यामुळे त्यांची विमान सेवा चर्चेत आली होती. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देखील मिळाले आहे
