Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

बालगंधर्व चौकात प्रति शिवसेना उभारणार -नाना भानगिरे

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष कमी होताना दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाकडून धक्का देणारे निर्णय घेण्यात येत असतानाच प्रति शिवसेना भवन उभारण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतला आहे. शिवसेनेचं मुंबईच्या दादर येथली छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ भव्य शिवसेना भवन आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील बालगंधर्व चौकात झाशी राणी पुतळ्या समोरील कॉम्प्लेक्स येथे प्रति शिवसेना उभारण्याचा निर्णय घेतला आहे .अशी माहिती शिंदे गटाचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिली.

आज या ठिकाणची पाहणी करण्याकरिता आले असता. नाना भानगिरे व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय भोसले त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाना भानगिरे म्हणाले,पुण्यात डेक्कन परिसरात सध्या शिवसेनेचे कार्यालय आहे. सरकारच्या निर्णय जनतेपर्यंत पोहचावे यासाठी पुण्यातील हे कार्यालय महत्त्वाचे ठरणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले. नव्या सेनाभवनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे. चालू असलेल्या श्रावण महिन्यातच प्रति शिवसेना भवन चालू करणार आहोत. असे नाना भानगिरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading