न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा
पुणे : डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तीन रंगांचा ७५ हा अंक शाळेच्या मैदानावर तयार करून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा केला. शिक्षक विनायक रामदासी यांची संकल्पना होती. मुख्याध्यापिका दर्शना कोरके, उपमुख्याध्यापक सुधीर विसापुरे, पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी मार्गदर्शन केले.
