fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

जातीय भेदभाव, अस्पृश्यतामुक्तीसाठी प्रयत्नांची आवश्यकता -डॉ. अशोक सिद्धार्थ

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता मुक्त भारताच्या संकल्प कधी केला नाही.भाजप सत्तेवर आली तर कॉंग्रेसमुक्तीचा, तर कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सांप्रदायिक द्वेष,आरएसएस मुक्त भारताचा संकल्प करते.स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याही पक्षाने अस्पृश्यता, जातीय भेदभाव, गरीबी, बेरोजगारी, दलित महिला अत्याचार मुक्तीची साधी चर्चा देखील केली नाही. पंरतु, सर्वजनाच्या हितासाठी आणि सर्वजनाच्या सुखासाठी केवळ बसपाच पक्ष स्थापनेपासून प्रयत्नरत्न आहे,असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब यांनी शुक्रवारी केले. बसपा पुणे जिल्ह्याच्यावतीने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित ‘भ्रष्टाचार मुक्त पुणे’संकल्पासाठी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याला डॉ.सिद्धार्थ यांनी संबोधित केले.यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब तसेच प्रदेश प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी साहेब उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमाच्या सुरूवातील राष्ट्रध्वज हातात घेवून उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रगीत गात देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुढे उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.सिद्धार्थ म्हणाले की,आजही शोषित, पीडित, उपेक्षित खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत का? याचा विचार करण्याची गरज आहे. मनुष्यांकडूनच आजही गटारे स्वच्छ करून घेतली जात आहे.शेकडो लोकांचा त्यामुळे मृत्यू होतोय.आजही अनेक ठिकाणी दलित, शोषितांसोबत भेदभाव केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी तसेच देश आणि पुण्याला भ्रष्टाचारामुक्त करण्यासाठी केंद्रात बसपाचे सरकार महत्वाचे आहे.पुण्यात बसपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवून आल्यानंतर जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होईल.त्यामुळे मोठ्यासंख्येत बसपाचे नेतृत्वात सभागृहात पोहचवण्याचे आवाहन,डॉ.सिद्धार्थ यांनी केले.सर्वांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेबांनी केलेला संघर्ष. त्यांचा हा संषर्घ संग्रामापेक्षा कमी नाही. अशात महानपुरुषांच्या जम्नभूमीत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालत मा.बहन सुश्री मायावती जी यांच्या नेतृत्वात बसपाचे हात बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.सिद्धार्थ साहेबांनी केले.

कार्यक्रमात प्रदेश महासचिव  सुदीप गायकवाड,  अप्पा साहेब लोकरे,  भाऊ शिंदे,  अजित ठोकळे,  सुरेश   गायकवाड,  बाळासाहेब आवारे, शीतल  गायकवाड,  अभिजित मनवर,  रमेश आप्पा गायकवाड,  .अशोक गायकवाड, .मेहमूद जकाते,  सागर खंडे, मोहमद शफी,  बापू कुदळे,  निधी वैद्य, सुरेखा कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रीतम सेठ धारिया तसेच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading