Sunday, September 6, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देवेंद्र फडणवीस होणार पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

पुणे: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर सव्वा महिन्याने झाला आहे. परंतु, अद्यापही खातेवाटप आणि जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. परंतु, 15 ऑगस्टपुर्वी पालकमंत्र्याची घोषणा करणार असल्याची माहिती शिंदे सरकारने दिली आहे. अशात पुणे जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळण्याची शक्यता आहे.
शिंदे सरकार सत्तेत येऊन सव्वा महिना उलटला तरीही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशात स्वातंत्र्य दिनापुर्वी म्हणजेच 15 ऑगस्टपुर्वी पालकमंत्र्याची घोषणा करणार असल्याचे शिंदे सरकारने सांगितले आहे. यामुळे कोणाला कोणत्या जिल्ह्याचे पालकत्व मिळणार याची उत्सुकता सर्वांनी आहे. तर, पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता आहे. याबद्दलचे सुतोवाच नवनिर्वाचित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
शिंदे सरकार सत्तेत येऊन सव्वा महिना उलटला तरीही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेले नाहीत. यावरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अशात स्वातंत्र्य दिनापुर्वी म्हणजेच
शिरूर येथे चंद्रकांत पाटील यांनी अनौपचारिकपणे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री असा केला. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तर, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना पुण्याचे पालकत्व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होते. यामुळे अजित पवार यांना शह देण्यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत.
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकत्व देवेंद्र फडणवीस आपल्या ताब्यात ठेवण्याची शक्यता आहे. आगामी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांची ही रणनिती आखल्याचेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading