Thursday, May 14, 2026
Latest NewsPUNE

मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यासाठी कार्यशाळा

पुणे : भारत निवडणुक आयोगाच्या शिफारशीनुसार मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्यासाठी व प्रमाणीकरणासाठी मतदारांची ऐच्छिकपणे आधारची माहीती संग्रहित करण्याबाबतच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची ऐच्छिकपणे आधारची माहिती मतदार यादीतील तपशीलाशी जोडण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्रमांक ६ ब ची नोंदणी करून या कार्यशाळेला प्रारंभ केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, तहसिलदार रूपाली रेडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.

अधिकारी तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचा अर्ज क्र.६ ब भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ६ ब चा अर्ज ऑनलाईन भरण्याबाबतची माहिती दिली.

पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाची कार्यालये, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्या कार्यालयामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक कार्यालयामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. ६ ब भारत निवडणुक आयोगाच्या http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन’ अँप आपल्या डाऊनलोड करुन भरता येईल . जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार यादीच्या तपशीलाशी जोडण्याची कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading