कॉँग्रेसच्या वतीने मैत्री सद्भाव सायकल रॅलीचे आयोजन
पुणे : शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि. ७ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील विद्वेशी राजकारणाच्या विरोधात ” मैत्री सद्भाव सायकल रॅलीचे ” आयोजन आज करण्यात आले.
सकाळी ७.३० वा., काँग्रेस भवन येथून पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे प्रदेश काँग्रेस कमिटीचेउपाध्यक्ष रमेश बागवे अॅड अभय छाजेड कमलताई व्यवहारे नगरसेवक अविनाश बागवे सचिन आडेकर प्रवीण करपे सीमा सावंत सह लोकायत चे सर्व सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काँग्रेस भवन येथून हुतात्मा कर्णीक स्मारक तेथून पुढे मामलेदार कचेरी येथे राजे उमाजी नाईक स्मारक तसेच गुरुवर्य जगताप पुतळा तेथून पुढे स्वारगेट चौक येथे देशभक्त कै.केशवराव जेधे पुतळा नेहरू स्टेडियम येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा सारसबाग येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व जमानालालजी बजाज यांचे स्मारक इथून पुढे वसंतदादा पाटील यांचे पुतळ्या पासून टिळक स्मारक मंदिर येथे तेथून पुढे गुडलक चौक येथील नामदार गोकुळ गोपाळकृष्ण गोखले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही सायकल रॅली येथे समारोप करून या अमृत महोत्सवाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी दस पोळेकर हरिदास अडसूळ हेमंत राजभोज संदीप आटपालकर अविनाश अडसूळ गौरव बोराटे सुरेश कांबळे भगवान कडू कान्होजी जेधे आदींसह अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी सायकल रॅलीला उपस्थित होते.
