fbpx

MPSC परिक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस; विद्यार्थ्यावर होणार कायदेशीर कारवाई

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज राज्यात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्ह्यातील नऱ्हे येथील उपकेंद्रावर गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी केवलसिंग चैनसिंग गुसींगे या विद्यार्थ्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा कडून मिळालेल्या माहितीनुसार, आज आयोगाच्या वतीने महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता राज्यात विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे विद्यार्थ्यावर संशय आल्याने या विद्यार्थ्याची तपासणी केली गेली. या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्ल्यूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले.

दरम्यान, या विद्यार्थ्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयोगाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर ट्विट करून जाहीर केले आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: