fbpx

‘गौरी गणपती साहित्य जत्रे’चे दि. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजन 

पुणे : दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवन मैदानावर सकाळी १० ते रात्री २० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.गौरी गणपती निमित्त सर्व संबंधित वस्तूंची खरेदी  “वाती ते मूर्ती ” सर्व एकाच छताखाली करता यावी, त्यात दर्जेदारपणा व माफक किंमत असावी आणि महिलांना रोजगार मिळावा या हेतूने या साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात येते.
यंदा या उपक्रमाचे १३ वेळ वर्ष आहे.यामध्ये सुमारे ७० ते ८० स्टॉल असून महिला बचत गटाच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात येणार आहे, त्याचबरोबर पुरुष बचत गटांनाही स्टॉल देण्यात येणार आहे.तसेच नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत असलेल्या बचत गटांनाही समाविष्ट केले जाते. या साहित्य जत्रेमध्ये गौरी गणपती मूर्ती,आरतीचे साहित्य,गौरीचे दागिने,मखर व अन्य आरास यासाठी आवश्यक साहित्य त्याचबरोबर मोदक,फराळ,व प्रसादाचे पदार्थ, साहित्य व वस्तू आदी रास्त दरात विक्रिसाठी उपलब्ध असतील.कोरोनाच्या पार्श्व भूमीवर गेले २ वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला नाही.परंतु त्यामागील वर्षा झालेल्या गौरी गणपती साहित्य जत्रेत २१ लाखांहून अधिक विक्री झाली होती.
यावर्षी देखील या महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी माहिती गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सवाच्या आयोजिका संगिता तिवारी यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे. या महोत्सवाचे आयोजन पायल तिवारी फौंडेशन व प्रियदर्शिनी वुमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे.ज्या बचत गटांनाव व्यावसायिकांना साहित्य जत्रेमध्ये सहभागी व्हायला असेल त्यांनी कॉंग्रेस भवन, शिवाजीनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: