fbpx

म्हातोबा टेकडीवर वृक्षारोपण

भांबुर्डे रेंज, वन विभाग, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज पुणे व व्ही के ग्रुप यांचा उपक्रम

पुणे : वन विभागाच्या जागेवर साधारण 90 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १६५ देशी झाडाची लागवड करण्यात आली.  भांबुर्डे रेंज, वन विभाग व पर्यावरण क्षेत्रात काम करणारी संस्था सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज, व्ही के ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम कोथरूड येथील म्हातोबा टेकडीवर पार पडला.

यावेळी सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज च्या ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी, अमोल उंबरजे, शिवली वाईचल, व्ही के ग्रुप च्या दीपा बोकील, वन विभागाचे पी बरले, बाळू तिगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे महानगर पालिका, आयजीबीसी पुणे, महा एनजीओ फेडरेशन, जिनसपोर्ट, रेजिलिएन्ट, जेनोमबीओ, नवक्षितिज, जिओ फौंडेशन, रिझो, इशरे, रिहा, एफएसएआय, एस एस व्हिजन, शांतिदुत परिवार, टीसपीएल ग्रुप, युनिक इनवारोकेअर ह्या संस्थेचे प्रतिनिधीही वृक्षारोपनामध्ये सहभागी झाले होते.

सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवज व वन विभागाच्या सहकार्याने वृक्षरोपण करण्याचा हे पाचवे वर्ष आहे. संस्थेच्या वतीने वृक्षरोपण करण्यासाठी दरवर्षी अनेक सामाजिक संस्थांना व नागरिकांना आवाहन करत असतो असे सस्टेनाबिलीटी इनिशीएटीवजचे अमोल उंबरजे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: