Thursday, October 22, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला

पुणे : शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर ठाकरे समर्थकांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ठाकरे समर्थकांनी त्यांच्या गाडीवर दगड फेक केली. या हल्ल्यात सामंत यांच्या सोबतचे सहकारी जखमी झाले असून सध्या सामंत व त्यांचे जखमी सहकारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची संध्याकाळी कात्रज चौकात सभा होती. यावेळी शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांची गाडी तेथून जात होती. यावेळी ठाकरे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गद्दार-गद्दार असे म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या गाडीवर दगड भिरकावले आहेत. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची काच फुटली.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही पुणे दौरा होता. संध्याकाळी त्यांच्याहस्ते दगडुशेट गणपती मंदिरात आरती होणार होती. याच आरातीमध्ये सहभागी होण्यासाठी उदय सामंत जात असताना ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading