Rain Alert : येत्या ५ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पाच ऑगस्टपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 दिवसात दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच देशाच्या मध्यवर्ती भागांमध्ये कमी झालेला पाऊस 4 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाची शक्यता आहे.
तसेच तिसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता IMDने वर्तविली आहे.
2 Aug; येत्या ५ दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह 🌩🌩 गडगडाट होण्याची शक्यता आहे.
तसेच तिसऱ्या दिवसापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
IMD द्वारे दैनंदिन अलर्ट अद्यतने पहा. pic.twitter.com/WUZoFCm2hX— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2022
येत्या पाच दिवसात दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली; असून येथे IMD ने रेड अलर्ट दीला आहे.
IMD's all India Severe Weather Alerts for coming 5 days
🔸Extremely heavy rainfall spells likely to continue over parts of S Peninsular India during nxt 3 days.
🔸Subdued rainfall activity ovr Central parts of country likely to continue till 4 Aug & gradually increase thereafter pic.twitter.com/jNEiTg0wxH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2022
