fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे शहरातील क्रीडानिकेतन शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमण्याची ‘मनविसे’ची मागणी

पुणे : शहरातील महापालिकेच्या क्रीडानिकेतन शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नेमणूक करण्याबाबत चे निवेदन मा सूरज मांढरे ( आयुक्त , शिक्षण महा राज्य ) व मा विक्रम कुमार ( आयुक्त , पुणे मनपा ) यांना देण्यात येऊन क्रीडा  शिक्षकांची नेमणूक त्वरित करावी अशी मनविसे ने मागणी केली. वरील शाळांमध्ये क्रीडा शिक्षक यांची त्वरित नेमणूक करावी अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा  पुणे मनविसे सचिव अशोक पवार व विभागाध्यक्ष कुलदीप घोडके यांनी दिला. 

मनविसे ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे शहरामध्ये आॅलिंपिक दजार्चे खेळांडू तयार व्हावेत यासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून क्रीडा निकेतनच्या शाळा सुरु केल्या. परंतु महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मुळे क्रीडा शिक्षकांची नियुक्तीच करण्यात आली नसून, सध्या अनेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक उपलब्ध नसल्याचे आमच्या पाहणीत आले असून शहरातील खेळांडूना स्थानिक पातळीवर खेळासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरामध्ये तीन अनिवासी क्रीडा निकेतन सुरु करण्यात आली. या शाळांमध्ये एकूण ५०० च्या वर विद्यार्थी शिकत आहे,. पुणे शहरामध्ये चांगल्या दर्जाचे खेळांडू तयार होण्यासाठी महापालिकेच्या वतीने दर वर्षी या क्रीडा निकेतन शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. या क्रीडा निकेतनच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत नाष्टा, जेवण, दूध, फळे उपलब्ध करुन दिली जातात. या क्रीडा निकेतनच्या शाळांमध्ये त्याच दजार्चे प्रशिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या वतीने मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती केली जाते. परंतु अनेक वर्ष लोटले तरी अद्याप मानधनावर क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या चार क्रीडा निकेतन शाळांसाठी २५-३० क्रीडा शिक्षकांची गरज असून गेल्या अनेक वर्षांपासून एकही क्रीडा शिक्षक उपलब्ध नाही. यामुळे शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची भूमीका पार पाडण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार आम्हाला समजला .

शहरातील खेळाडूंना स्थानिक पातळीवर खेळासाठी उत्कृष्ट सुविधा व तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सिंहगड रोड येथे खाशाबा जाधव अनिवासी क्रीडा निकेतन सुरू करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे, हडपसर येथे भारतरत्न सचिन तेंडूलकर क्रीडा निकेतन कार्यरत आहे तर येरवडा येथे क्रीडा निकेतन शाळा कार्यरत आहे. सिंहगड रोड येथील क्रीडा निकेतनमध्ये कबड्डी, खो-खो, मल्लखांब, योग, कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. येरवडा परिसरातील क्रीडा निकेतनमध्ये विद्यार्थ्यांना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, योग, कुस्ती हे क्रीडा प्रकार शिकविले जातात तर हडपसर येथील क्रीडा निकेतनमध्ये हॅन्डबॉल, थ्रोबॉल, योगा, मल्लखांब, कुस्ती, अॅरथलॅटिक्स इत्यादी क्रीडा प्रकार शिकविले जातात.

पुणे शहरामध्ये क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने सन २०१३ क्रीडा धोरण जाहीर केले होते . शहराचे स्वतंत्र क्रीडा धोरण करणारी देशातील पहिली महापालिका असून प्रत्यक्षात पुण्याचे क्रीडा धोरण केवळ कागदावर राहीले असल्याचे दिसून येत आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading