आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात येणार आमने – सामने
पुणे : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर येत आहे. विशेष म्हणजे आजच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुण्यात या दोन्ही नेत्यांकडून टोलेबाजी पाहायला मिळणार आहे.
पुणे शहरातही शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसैनिकांकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. अनेक शिवसैनिक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर उद्या आदित्य ठाकरे हे पुण्यातील कात्रज येथे
जाहीर सभा घेणार आहेत . आदित्य ठाकरे सध्या शिव संवाद यात्रा अख्या महाराष्ट्रभर करत आहेत.
विशेष म्हणजे, सायंकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे कात्रज येथील तानाजी सावंत यांच्या निवास्थानी भेट देणार आहे. तर सायंकाळी 6:45 मिनिटांनी आदित्य ठाकरे हे कात्रज येथे शिवसंवाद साधणार आहे. म्हणजेच उद्या पुणे शहरात दोन्ही नेत्यांकडून टोलेबाजी पाहायला मिळणार आहे हे नक्की.
