Tuesday, May 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

त्यांच्या घरातील पैशांवर मी माझं नाव लिहू शकतो का? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरात ईडीला सापडलेल्या रोख रकमेपैकी काही नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव लिहिल्याचं आढळून आलं होतं. या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांवर माझं नाव कसं आलं हे मला माहिती नाही. त्यांच्या घरातील पैशांवर मी माझं नाव लिहू शकतो का? असा सवाल करता त्या पैशांबाबत तुम्हाला संजय राऊतच सांगू शकतील.असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हा काय प्रकार आहे हे केवळ संजय राऊतच सांगू शकतील त्यामुळं हे त्यांनाच विचारायला हवं. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुण्यात मुख्यमंत्र्यांनी आज पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 
शिंदे सरकारला एक महिना पूर्ण होत आहे पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. पण आमचे सरकार चांगले चालले आहे.लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल’. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक हेलिकॉप्टर थांबवल्याची एक बातमी व्हायरल झाली आहे. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले,पण त्यांचं झालं काय, पाटण्यामध्ये एक प्रकार घडला होता. तिथे आपले मराठी कुटुंबीय होते. त्यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईत परत आणायचे होते. दादा भुसे यांच्या संपर्कातील नेत्याचे एक मुंबईतील हॉस्पिटलमध्ये काम होते. त्यामुळे मला फोन करायचा होता. त्यासाठी मी पुढे जाण्याआधी हेलिकॉप्टर चालकाला थांबण्याचे आदेश दिले होते, असा खुलासाच शिंदेंनी केला.
नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने फुटबॉल मैदानाच उदघाटन करणार होते. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले.पण एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या ऐवजी आनंद दिघे यांच्या नावाने उदघाटन करणार आहे. मी त्या कार्यकर्त्याला आधीच सांगितलं होतं, माझं नाव असलं की अशा कार्यक्रमाला मी जात नसतो. आता त्याने प्रेमापोटी केलं असेल. आता त्याने आनंद दिघे नाव दिले आहे.असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading