Saturday, September 5, 2026
BusinessLatest News

भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी रिपॉसतर्फे ‘है हौसला है जुनून..’ गाणं सादर  

पुणे : भारतातील आयओटी तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या डोअरस्टेप इंधन वितरण उद्योगातील अग्रणीय रिपॉस  या कंपनीने  देशाच्या  ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी ‘है हौसला है जुनून..’ गाणं सादर  केलं आहे . भारतासाठी स्टार्टअपचे अशा प्रकारचे हे  ‘पहिलेच’ गाणे तयार करण्यात आले आहे .या गाण्याचा प्रकाशन समारंभ ३० जुलै २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळेस इंडियन आयडॉल सीझन १२ फायनल रनर अप  आशिष कुलकर्णी, रिपॉसच्या संस्थापक आणि मुख्य व्हिजनरी ऑफिसर अदिती भोसले वाळुंज आणि रिपॉसचे संस्थापक आणि सीईओ चेतन वाळुंज यांनी सहभाग घेतला.

‘है हौसला है जुनून’ ही भारताच्या विकासात योगदान देण्याच्या प्रत्येक तरुण भारतीयांच्या निर्धाराची कथा आहे. २००० हून  अधिक भागीदार आणि २२० हून अधिक शहरांमधील कामकाज  असलेले  रिपॉस यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय रस्त्यांवरील उपेक्षित नायकांचा सन्मान करून त्यांना त्यांची योग्य ओळख मिळवून देऊ इच्छिते. रिपॉसच्या फ्युएलिंग इंडिया मोहिमेच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून  वीरांची भावना,  दृढनिश्चय आणि धैर्य यांचे गुणगान गाणारे ‘है हौसला है जुनून’ गाणं  रिपॉसने सादर केले आहे.

रिपॉसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन  वाळुंज  म्हणाले की संगीत कनेक्ट करू शकते, बदलांना प्रोत्साहन देऊ शकते आणि लोकांच्या जीवनाला स्पर्श करू शकते, यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच, ‘है हौसला है जुनून’ लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे. एकीकडे  भारत विकासाकडे वाटचाल करत असताना आमच्या फ्युएलिंग इंडिया मोहिमेचा आणि अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी आमच्या विनम्र उपक्रमांचा आम्हाला अभिमान आहे. या उपक्रमासाठी स्वतःचा आवाज दिल्याबद्दल मी आशिष कुलकर्णी यांचा आभारी आहे.

रिपॉसच्या संस्थापक आणि मुख्य व्हिजनरी ऑफिसर आदिती भोसले  वाळुंज  म्हणाल्या की, हे गाणे अशा अनेक व्यक्तींसाठी आहे जे शांतपणे आपले कर्तव्य करतात आणि क्वचितच प्रसिद्धीच्या झोतात येतात. आपत्कालीन सेवा, संरक्षण, शिक्षण, क्रीडा आणि राजकारण यांसारख्या क्षेत्रांतील नायकांपुढे जग नेहमीच नतमस्तक झाले आहे. मात्र इतर अनेक विभागांना क्वचितच त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान्यता मिळते. आपल्या राष्ट्राची चाके फिरती ठेवणारे योद्धे हा असाच एक घटक आहे. या कामगारांना अभिवादन म्हणून रिपोसने ‘है हौसला है जुनून’ सादर केले आहे.

Link to the song :

Youtube: https://youtu.be/XfpChqS0Ytg

Spotify: https://open.spotify.com/track/0ELXx5BZa0RmqhAYHtO60y?si=Ndw-rUW1Q9CIlfXX8QOkmQ

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading